गुरुवारी पुष्यनक्षत्र आल्यास तो गुरुपुष्यमृत योग असतो. त्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. प्रत्येक गुरु पुष्य योगावर सव्वा मासा, अश्याप्रकारे २७ गुरु पुष्य योगांवर तितके सोने विकत घेऊन मग त्याची अंगठी करतात. ही अंगठी धनलाभ घडवते व सर्व कार्यास यश देते. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. ह्या दिवशी सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. गुरुपुष्यामृतला सोनं, चांदी, हिरे आणि नवरत्न खरेदीचा शुभमुहूर्त मानले जाते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. गुरुपुष्यामृतला सोनं, चांदी, हिरे सोबतच पुष्कराज रत्नाला देखील मान्यता आहे.
जाणून घेऊया पुष्कराज रत्न!
पुष्कराज ((Yellow Sapphire)) हे रत्न भारतात प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. जन्मपत्रिकेत गुरुबळ नसता हे रत्न अंगठीत घालण्याचा सल्ला दिला जातो.
अस्सल पुष्कराज रत्नांची पारख करण्यात या तीन गोष्टी महत्वाची आहेत. फ्लोरिन, अल्युमिनिअम, हायड्रोक्सिल या धातूंचे मिश्रण तसेच कार्बन डाय ऑक्साईड व पाण्याचे अति तरल प्रमाण. हे घटक पुष्कराजच्या नैसर्गिक निर्मितीत आढळतात.
जगातील सर्वोत्तम पुष्कराज श्रीलंकेतील रत्नपुरा येथील खाणीत मिळतो. तसेच बँकॉक, लॅटिन अमेरिका, मॅदागास्कर व युराल पर्वतरांगांतील ग्रेनाईट, नाईट्स, पेगमेटाईट खडकांच्या खाणींमध्ये पुष्कराज रत्ने सापडतात.
पुष्कराज रत्नाचे प्रकार:
सोनेरी रंगाचे, लिंबाच्या सालीच्या रंगाचे, पांढरे,केशरी, हळदीच्या रंगाचे, फिकट पिवळ्या रंगाचे पुष्कराज आढळतात.
पुष्कराजचे गुणविशेष:
- हे रत्न वजनदार व स्थूल असते.
- स्पर्श केल्यास हाताला मऊ भासते.
- पारदर्शक असते.
- पाणीदार व चमकदार असते.
पुष्कराज रत्नाचे औषधी गुण
- हे रत्न धारण केल्यास रक्तदाब व हृदयविकार आटोक्यात राहण्यास मदत होते.
- निरर्थक काळजी, चिंता, न्यूनगंड या गोष्टींपासून सुटका.
पुष्कराज रत्नाचे दैवी गुण
- हे रत्न धारण केल्यावर संकटकाळ कमी होते.
- अशक्य वाटणाऱ्या मोठमोठ्या गोष्टी सहजपणे प्राप्त करू शकता.
- भाग्योदयास सुरुवात होते. मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
- पतीच्या उन्नती करता स्त्रीयांनी हे रत्न धारण करणे हिताचे.
- लग्नास अनावश्यक विलंब होत असल्यास पुष्कराज वापरावा.
- पुष्कराज मुळे स्मरणशक्ती, बुद्धी, निर्भयता सुधारते.
- विद्यार्थ्यांना परिक्षेतील यश व करिअरसाठी अतिशय गुणकारी.
पुष्कराज रत्नाचे प्रमाणपत्र यांपैकी एका संस्थेचे असावे.
- Gemological Institute of India (GII) मुंबई.
- Gems and Diamond Certification मुंबई.
पुष्कराज रत्नविषयीची ही माहिती गोविंद दंडे अँड सन्स यांची स्वतःची नसून उपलब्ध माहिती वर आधारित आहे.
Comments
Pooja Jaybhave on 22 Feb 00:07
Thanks 😊 khup important mahiti dili
Santosh Ramnath Kale. on 22 Feb 00:07
अतीशय सोप्या भाशेत उपयूक्त चांगली माहीती. धन्यवाद!!