नाशिकरोड येथील ' गोविंद दंडे अँड सन्स प्रा. लि.' ही सुवर्ण पेढी गेल्या अनेक दशकांपासून नाशिक रोडच नव्हे तर संपूर्ण नाशिकमधील एक अग्रगण्य ग्राहकपसंतीची सराफी पेढी आहे. यंदा ही पेढी आपला ९५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
५ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या वर्धापनदिनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कलकत्ता, राजस्थान अशा विविध प्रांतातील सुप्रसिद्ध बाजारपेठांमधून आणलेल्या टेम्पल, टर्की, कलकत्ती दागिन्यांच्या तसेच लाइट वेट डायमंडच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीजचा खजिना ग्राहकांना पाहावयास मिळतो आहे. लाइट वेट पासून ते हेवी वेट पर्यंत दागिन्यांची भव्य आणि आकर्षक रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
खास ९५ व्या वर्धापनदिनानिमित्त पेढीतर्फे ग्राहकांना सोन्याच्या आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल ७०% सूट देण्यात येत आहे. ही ऑफर २० फेब्रुवारी पर्यंत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहे. मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस, चेन, टॉप्स तसेच डायमंडच्या दागिन्यांची खरेदी ग्राहकांतर्फे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
या महोत्सवातील सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे ते म्हणजे पेढीमध्ये असलेल्या तब्बल ३ किलो वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि अर्धा किलो वजनाचा नेकलेस. बघताक्षणी डोळे विस्फारतील एवढे भव्य असलेले हे दागिने बघणे ही देखील ग्राहकांसाठी एक मेजवानी आहे. ग्राहकांना दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज खरेदीसाठी पाहायला मिळाव्या या उद्देशाने ३०,००० पेक्षा जास्त दागिन्यांच्या डिझाइन्स पेढीमध्ये उपलब्ध आहेत.
कै.जयकृष्ण श्रीकृष्ण दंडे यांनी १९२७ साली लावलेल्या सराफी व्यवसायाच्या या छोट्याश्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. १९८४ साली श्री. गोविंद दंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी, दंडे अँड सन्सची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आज हाच वसा घेऊन दंडे कुटुंबातील चौथी कल्पक पिढी देवयानी दंडे आणि योगेश्वर दंडे यांच्या रुपाने व्यवसायात उतरली आहे.
१८० चौ. फुटापासून प्रारंभ झालेल्या दंडे अँड सन्सचे आज दत्तमंदिर चौक, नाशिकरोड येथे १०,००० चौरसफुटांचे तीन मजली भव्य असे शोरुम ग्राहकसेवेसाठी कायम सज्ज असते. संपूर्ण संगणकीकृत आणि वातानुकुलीत दालनात आपुलकीने वागणारा कर्मचारी वृंद आणि हॉलमार्किंगचा आग्रह धरणारी कामकाज पद्धत ही या सुवर्ण पेढीची खास वैशिष्टे आहेत. पेढी वरील दाग – दागिन्यांच्या बाबतीत पेढी कायमच नाविन्य जपत असते त्यामुळेच ग्राहकवर्ग इथे येण्यास नेहमीच आतुर असतो.
दागिने विकत घेत असतांना ग्राहक दागिना घडण्याच्या प्रवासा बद्दल अनभिज्ञ असतो, हा प्रवास पेढीवर दाखवला जातो तो चित्रफीतीच्या माध्यमाद्वारे. सोन्याच्या खाणी, हिऱ्यांच्या खाणी पासूनचा प्रवास दागिने घडतात कसे, त्यांची शुद्धता ओळखावी कशी ? या पर्यन्त येतो . निश्चितच हा मनोरंजक प्रवास ग्राहकांच्या ज्ञानात भर घालतो. त्याचबरोबर दागिन्यांबाबत कुतूहल व जागरूकता निर्माण करण्यासाठी सोन्या-चांदीचे दुर्मिळ दागिने, या दागिन्यांचा इतिहास, दागिने बनवण्याची पूर्वीची हत्यारे, चांदीचे प्राचीन दागिने यांचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि माहितीचे तक्ते बघणे ही देखील ग्राहकांसाठी मोठी पर्वणी ठरते आणि केवळ ग्राहकच नाही तर शाळकरी, महाविदयालयीन विद्यार्थी त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मंडळींचे गट, महिला मंडळे यांचा हे अनोखे संग्रहालय बघण्यासाठी कायम पेढीवर राबता असतो.
केवळ व्यावसायिकता जपणाऱ्या यशस्वी पेढयांची चिक्कार नावे असतीलही, पण स्वविकासासोबत समाजविकासाचा ध्यास गोविंद दंडे अँड सन्स फाउंडेशनला आहे. म्हणूनच दंडे फाउंडेशनच्या माध्यमाद्वारे १०वी व १२वी च्या गरजू व हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. अलिकडेच या फाउंडेशनने अनेक खेडयांमधील शाळांमध्ये जाऊन तेथील विदयार्थांना वह्यांचे वाटप केले . शाश्वत विकास हा समाजप्रगतीनेच होत असतो हे दंडे परिवार जाणून आहे . व्यवसाय करीत असतांना ते कायम ग्राहकाभीमुख योजनांचा स्वीकार करीत असतात .
गोविंद दंडे अँड सन्स ने केवळ ग्राहकांसाठीच दागिने बनवले नाही तर प्रख्यात देवस्थान वणीची श्री सप्तशृंगी देवी व पंचवटीतील श्री काळाराम मंदिर या देवतांचेही भव्य दागिने बनवले आहेत.
ग्राहकाभिमुख सेवा, विश्वास, पारदर्शकता आणि दर्जा ही मुल्ये जपणाऱ्या गोविंद दंडे अँड सन्स ला अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) या भारतातील अग्रगण्य संस्थेतर्फे ‘भारतातील बेस्ट रिटेल स्टोअर-२०१८’ पुरस्कार, ‘पश्चिम भारतातील बेस्ट सिंगल स्टोअर ऑफ द इयर’ पुरस्कार, तसेच नॅशनल ज्वेलरी अवार्ड व मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळातर्फे ‘मराठी उद्योग भूषण’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार दंडे अँड सन्स ने मिळवले आहेत.
उत्कृष्ठ व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची साथ आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर गोविंद दंडे अँड सन्सने नाशिक शहर व परिसरातील ग्राहकांची मनं जिंकली आहे. ०५ ते २० फेब्रुवारी दरम्यान पेढी आपला ९५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. रोपाचा - वृक्ष आणि वृक्षाचा वटवृक्ष होण्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.